शंभर टक्के उपस्थिती सक्तीची असताना आजारपण आणि व्हिसाच्या अपरिहार्य कारणांस्तव मायदेशी परतावे लागले, तरी अमेरिकेतील 'एक्झिक्युटिव्ह एमबीए' अर्ध्यावर न सोडता 'ऑनलाइन' परिश्रम घेऊन 'त्याने' अखेर पदवी संपादन केलीच! 'बोस्टन'सारख्या जगातील अग्रमानांकित विद्यापीठाने या चिकाटीला दाद देत, खास बाब म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पदवी प्रदान करून अभिजीत म्हेत्रे या मराठी तरुणाचा विशेष गौरव केला आहे.