कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे मनोरंजन विश्व ठप्प पडले होते. चित्रपट व मालिकांचे शूटींग रखडले होते. मात्र गेल्या 10 दिवसांपासून पुन्हा शूटींगला सुरुवात झालीय. काही अटी व शर्तींसह शूटींगला परवानगी देण्यात आली होती. पण कोरोना व्हायरस टपून बसला असताना हे काम सोपे नाही, हे आता दिसू लागले आहे. होय, अलीकडे तेलगू मालिकांची अभिनेत्री नव्या स्वामी हिला शूटींगदरम्यान कोरोनाची लागण झाल्याने सर्वांच्याच चिंता वाढल्या आहेत. 1 जुलैला नव्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली.नव्या आठवड्यापासून एका मालिकेचे शूटींग करत होती. यादरम्यान सर्वोतोपरी काळजी घेतल्यानंतरही तिला कोरोनाची लागणी झाली.
#lokmat #NavyaSwamy #CoronaPositive #Coronavirus #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber