मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणरायाच्या विसर्जनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक एकवटले आहेत.संपूर्ण गणेश विसर्जनात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हेलिकॉप्टरमधून पहारा दिला जात आहे.गिरगाव चौपाटीवर मुंबईतील प्रसिद्ध, मोठ्या गणेश मंडळाच्या मूर्ती विसर्जनासाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.संध्याकाळच्या वेळेस गणेश भक्तांची गर्दी वाढत असल्यानं पोलीस बंदोबस्तही वाढवला गेला.